बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनसाठी हे वर्ष खूपच व्यस्त राहिले आहे. कार्तिकने अनेक चित्रपट साईन केले असून येत्या वर्षाच्या स्वागतासाठीही तो सज्ज झाला आहे. सध्या कार्तिक आपल्या आगामी “धमाका’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
तसेच तो आपल्या बहुचर्चित “शहजादा’ चित्रपटाचेही काम करत आहे. “शहजादा’साठी रोहित धवनने खास प्लान तयार केला आहे. या चित्रपटासाठी गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये एक भव्य सेट उभारण्यात आला आहे. या चित्रपटात कार्तिक हा एकदम वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे, जो की यापूर्वी चाहत्यांनी कधीही पाहिलेला नसेल.
“शहजादा’ संबंधी कोणतीही गोष्ट लिक होऊ नये यासाठी सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अभिनेत्यांसह सर्वांना सूचना करण्यात आली आहे की, सेटवर कोणतीही फोटो क्लिक करू नये आणि सोशल मीडियावरही पोस्ट करू नये.
दिग्दर्शक रोहित धवनने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यासाठी कार्तिकला 6 महिनांपर्यंत ऑनबोर्ड ठेवण्याचा विचार करत आहे. या चित्रपटाचे जास्तीत जास्त शूटिंग गोरेगावमध्ये पूर्ण केल्यानंतर संपूर्ण टीम दिल्लाला जाणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कार्तिकच्या “धमाका’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. तसेच कार्तिक “कॅप्टन इंडिया’, “फ्रेडी’, “भूलभुलैया-2′ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.