नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा लपून राहीलेली नाही. अगोदर गांधी कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून लढण्याची इच्छा असल्याचे त्यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते.
मात्र त्यात बदल करत आता त्यांनी अन्य दोन मतदारसंघांचीही नावे घेतली आहेत. मी अमेठीतूनच लढले पाहिजे असे काही नाही. मुरादाबाद किंवा हरियाणातील एखाद्या जागेवरूनही मी लढू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.
माझा विचार आहे की धर्मनिरपेक्ष राहीले पाहिजे आणि धर्माला राजकारणापासून अलिप्त ठेवले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. दरम्यान, गांधी कुटुंबाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला राजकारणात ओढले जात असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.