नगर – सर्व सामान्य नागरिकांना उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू, जात दाखला, शिधापत्रिका, गौण खनिज परवाना, सात-बारा उतारा अशा विविध कामांसाठी तहसील आणि जिल्हा प्रशासनातील कार्यालयात जाणे-येण्यासाठीचा वेळेची बचत व्हावी, त्यांना आपण राहत असलेल्या गावात दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. सेतू कार्यालय चालक या दाखल्यांसाठीचे दरपत्रक लावत नाहीत तर काही जण तातडीने हे काम करून देण्याच्या आमिषाने जादा पैसे उकळत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तहसील कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाचे केंद्र आहे. तिथे आल्यानंतर सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रमाणपत्रा दिले जातात. अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. अशा विविध अडचणीला जनतेला सामोरे जावे लागत होते. शासनाने लोकसंख्येच्या आधारावर सेतू कार्यालय मंजूर केले.
जिल्ह्यातील 2011 या वर्षातील लोकसंख्येच्या आधारावर जिल्ह्यात एक हजार 345 सेतू केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. सेतू केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतात. या केंद्रांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांची यादी, शासकीय खर्च आणि किती कालावधीत प्रमाणपत्र मिळणार याचा कालावधी लिहिलेला फलक लावणे बंधनकारक आहे. नागरिकांना प्रमाणपत्रासाठी आवश्यत ती कागदपत्रे सेतू कार्यालयात जमा करावी लागतात. सेतू केंद्र चालक या कागदपत्राची पडताळणी करण्याची जबाबदारी आहे. नियमानुसार कागदपत्रे घेऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी संबंधित कार्यालयाकडे पाठवावी लागते. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान सात ते 30 दिवसांचा कालावधी आहे. अनेक नागरिकांना कागदपत्रांची तातडीने आवश्यकता असते. त्यावेळेस काही सेतू चालक त्यांना तात्काळ तहसील कार्यालयातून दोन-तीन दिवसांमध्ये प्रमाणपत्र आणण्यासाठी प्रवास आणि चहा-पाणी खर्चासह शासकीय फी व्यतिरिक्त दोनशे-तिनशे रूपये जादा खर्च घेतात.
विविध प्रमाणपत्रांची आणि कालावधी याप्रमाणे (33 रूपये 60 पैसे सर्व प्रमाणपत्रांसाठी शासकीय फी आहे.)1) प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे (ऑफिडिव्हिट)-(तात्काळ)ॅ 2) वय अधिवास प्रमाणपत्र – 15 दिवस 3) वय व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र- 15 दिवस 4) उत्पन्न दाखला- 15 दिवस 5) वंशावळी प्रतिज्ञापत्र- तात्काळ 6) जात दाखला ओ.बी.सी.- 21 दिवस 7) जात दाखला एस.टी.- 21 दिवस 8) जात दाखला एस.सी.- 21 दिवस 9) जात दाखला एन.टी.- 21 दिवस 10) जात दाखला एस.बी.सी- 21 दिवस 11) नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र- 21 दिवस 12) ज्येष्ठ नागरिक कार्ड – 15 दिवस 13) ऐपतीचा दाखला- 15 दिवस 14) जन्म नोंद दाखला- 15 दिवस 15) मृत्यू नोंद आदेश दाखला-15 दिवस 16) गौण खनिज परवाना -15 दिवस 17) नमुना एसईएस प्रमाणपत्र -15 दिवस 18) डोंगरी प्रमाणपत्र -15 दिवस 19) शेतमजूर प्रमाणपत्र -15 दिवस 20) शेतकरी प्रमाणपत्र -15 दिवस 21) वारसा प्रमाणपत्र -15 दिवस 22) महिला 30 टक्के आरक्षण प्रमाणपत्र -15 दिवस 23) नवीन कौटुंबिक शिधापत्रिका -30 दिवस.
==============