आंबेठाण -येलवाडी (ता. खेड) येथे बुधवारी (दि. 17) पहाटे कोयत्याचा धाक दाखवून 6 लाख 66 हजार रुपयांची जबरी चोरी करण्यात आली, याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक पांडुरंग गोसावी (वय 25), राकेश गंगावणे, शुभम अवतारे, सुरज कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर प्रदीप नंदकुमार निगडकर (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, येवलेवाडी येथील हॉटेल ड्रायव्हार ढाब्यासमोर पहाटे पावणेचारच्या सुमारास निगडकर कार (एमएच 14 जीएन 3076) मधून देहूगाव येथून जात असताना दोन मोटर सायकलवरून आलेल्या चार जणांनी कार आडवून टेपचा आवाज जोरात का केला असा जाब विचारून गाडीवर कोयत्याने वार करून गाडीचे नुकसान केले.
तसेच चालकाला मारहाण करीत त्याच्याजवळील मोबाइल व 11 तोळे वजनाची सोन्याची चेन लंपास केली, तसेच परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहयक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.