चिंबळी -मोई (ता. खेड) येथे करोनाचे चार रुग्ण आढळून असून सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ता दोन ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून त्या ठिकाणच्या रस्त्यांवर बांबू लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.
मोई गावात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने या परिसरातील करजंविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चिंबळी येथील प्राथमिक उपकेंद्रच्या वतीने सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सेविक पी. पी. गायकवाड यांनी दिली.
तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करून संपुर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. तर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने गावात साफसफाई, औषध फवारणी सुरू केली आहे. गावात विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडामत्मक कारवाई केली जात आहे.आतार्यंत 2800 रूपयांचा दंड वसूल करण्यात आले असल्याचे ग्रामसेवक भास्कर वीर यांनी सांगितले.
यावेळी पोलीस पाटील नारायण बिडकर, आनंद गवारे, नीलेश गवारे, सर्व कर्मचारी व आदि मान्यवर उपस्थित होते.