सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याला आज एक महिना पूर्ण झाला. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. त्याच्या मृत्यूनंतर महिन्याभराने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि एक अत्यंत इमोशनल पोस्टही लिहीली आहे.
मात्र या पोस्टवरून तिला खुलेआम धमक्या मिळण्याचे सत्र देखील सुरूच आहे. आता या ट्रोलिंगला आणि धमक्यांना कंटाळून रिया चक्रवर्तीने एक पोस्ट केली आहे. सायबर सेलने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती रियाने केली आहे.
रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक इन्स्टा चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या युजरने तिचा बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप तिने या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. तिला आलेल्या या मेसेजमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, ‘जर तु आत्महत्या नाही केलीस तर तुझा रेप आणि खून केला जाईल. मी त्याकरता लवकरच माणसं पाठवेन’ असं ही ती म्हणाली आहे.