सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) – विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई वाघळवाडी सोमेश्वरनगर शाळेची १००% निकालाची परंपरा अबाधित राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्या प्रतिष्ठान सोमेश्वरनगर शाळेचे यावर्षी पहिल्या बॅचचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश उल्लेखनीय आहे.
शाळेत प्रथम येण्याचा मान नेहमीप्रमाणेच मुलींनी पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर वैष्णवी सुरेश आहेरकर ९३% गुण, श्रुती पांडुरंग बोबडे ९१.६०% गुण मिळवत द्वितीय तर, तृतीय क्रमांकावर सोहन सुनील खोमणे याला ९०.२०% गुण मिळाले आहेत. याशिवाय विषयवारही चांगले गुण मिळाले आहेत. इंग्रजी विषयात ९५ गुणांचा एक, तर मराठी विषयात ९९ गुणांचे तीन, हिंदी विषयात ९७ गुणांचा एक, गणित विषयात ९२ गुणांचा एक व सायन्समध्ये ९० गुणांचा एक तर समाजशास्त्र विषयात ९५ गुणांचे तीन विद्यार्थी. या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.