Kedarnath : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने ( Sara Ali Khan ) ‘केदारनाथ’ ( Kedarnath ) या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि लोकांना तो खूप आवडला होता. या चित्रपटात सारा सुशांत सिंग राजपूतच्या ( Sushant Singh )सोबत दिसली होती.
मुक्कू आणि मन्सूरची सुंदर प्रेमकहाणी आणि केदारनाथ आणि या ठिकाणाप्रती श्रद्धेने भरलेला हा चित्रपट आजही साराच्या हृदयाच्या जवळ आहे, म्हणूनच ती संधी मिळताच केदारनाथला निघून जाते. आज ‘केदारनाथ’ सिनेमाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत.
‘केदारनाथ’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर कायम सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल बोलताना दिसतात. आता देखील त्यांनी सुशांत आणि सारा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिषेक म्हणाले, ‘मला ती संध्याकाळ आजही आठवत आहे. जेव्हा आम्ही केदारनाथ सिनेमाची शुटिंग करत होतो. पावसातील सीन होता आणि प्रचंड थंडी होती.
सारा-सुंशात यांनी सीन पूर्ण करायचाच होता. दोघांनी थंडी आणि पावसात सीन शूट केला. तेव्हा सुशांत पूर्णपणे निळा पडला होता.. त्यावेळी सुशांतला फक्त वजन उचलायचं नव्हतं तर, थंडी आणि पाण्यात सीन देखील शूट करायचे होते. तेव्हा कोणतंही कारण न देता सुशांतने सिनेमाचं शूट पूर्ण केलं’. असं अभिषेक यावेळी म्हणाले.
दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला. आजही हा चित्रपट कधी लागला तर तो खूप आवडीने पाहिला जातो. हा चित्रपट 2013 मध्ये झालेल्या केदारनाथ दुर्घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आज 7 डिसेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.