बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. हे दोघे सतत चाहत्यांशी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
अशातच रितेश आणि जेनेलियाने विलासराव देशमुख यांच्या 76व्या जयंतीदिनी एक खूपच इमोशनल पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. जेनेलियाने आपल्या इंस्टाग्रामवर त्यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला.
View this post on Instagram
यात दिवंगत मुख्यमंत्री आणि जेनेलियाचे सासरे विलासराव देशमुख हे जेनेलियाची भेट घेताना दिसतात. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, डियरेस्ट पप्पा, जेव्हा एक सून सासरी येते तेव्हा तिच्या मनात एक भीती असते की तिच्या सासरची मंडळी तिला स्वीकार करणार की नाही.
View this post on Instagram
तेव्हा आपण मला विश्वास दिला की, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचेच नाते नसते. दुसरीकडे रितेश देशमुखनेही आपल्या वडिलांसोबतचा बालपणातील एक फोटो शेअर केला.
View this post on Instagram
या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, असा कोणताही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. मनातली ही जखम कधीही भरून निघणार नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा.’ असे त्याने लिहिले.
View this post on Instagram