मुंबई – हॉलिवूडमधील अभिनेत्री किम कार्दशियनकडे ‘ड्रामा क्वीन’ पाहिलं जातं. ती नेहमीच तिच्या अजब गजब फॅशन आणि विधानांमुळे चर्चेत असते. तिचे फोटो शूट नेहमीच सोशलवर तुफान व्हायरल होत असतात.
— Kim Kardashian West (@KimKardashian) May 23, 2021
गेल्या वर्षांमध्ये मांग टिका आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केल्याने किम कार्दशियन ट्रोल झाली होती. तर आता किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. यावेळी किमवर हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचे आरोप करण्यात आले आहे.
तिने सोशलवर तिचे फोटो टाकले असून या फोटोमध्ये किम गुलाबी रंगाच्या बेड वर असल्याचे दिसत आहे. लाल रंगाचा प्रिटेड ड्रेस किमने परिधान केला आहे. तर त्यासोबत किमने ओम हे धार्मिक चिन्ह कानातले म्हणून घातले आहे. यामुळे किम ट्रोल झाली आहे.
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे किम ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की किमने परिधान केलेले कानातले हे धार्मिक प्रतिक आहे, जे असे परिधान केले जाऊ शकतं नाही.
“ओम हिंदूंसाठी एक पवित्र प्रतीक आहे “हे सेलिब्रिटीज सांस्कृतिक प्रतीक वापरणे कधी थांबवतील? हे लाजिरवाणे आहे.” अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी किमला ट्रोल केले आहे. सध्या किम तिच्या या फोटोशूट मुळे चांगलीच चर्चेत आहे.