मुंबई – राज्यासह मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यात गेल्या काही दिवसात दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा आकडा सातत्याने हजारापेक्षा जास्त आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 881 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही उच्चांकी रुग्णसंख्या ठरली आहे. राज्यात आज 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 इतका आहे. चांगली बाब म्हणजे राज्यात आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत मात्र वाढ झाली आहे. सध्या राज्यात 8432 सक्रिय रुग्ण आहेत