संगरूर – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या घरी त्यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर होते.
संगरूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी चंदीगड विमानतळावरून निघालेला राहुल गांधींचा ताफा भरकटला व काही वेळ हा ताफा नियोजित नसलेल्या भागामध्ये फिरत होता. योग्य रस्ता न सापडल्यामुळे हा गलथापणा झाल्याचे काही माध्यमांनी अधोरेखित केले आहे. त्यावरून पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ राहुल यांच्या सुरक्षेतही कुचराई झाल्याचे स्पष्ट झाले असून या गंभीर प्रकरणाची दखल घेतली जाण्याची मागणी केली जाते आहे.
राहुल गांधींना केंद्राची उच्च दर्जाची सुरक्षा असताना त्यांचा ताफा रस्ता चुकलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून अद्याप यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.