पुणे-मार्केटयार्डातील गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक व मागणीही वाढली आहे. त्यामुळे भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. शोभीवंत फुलांना मागणी चांगली आहे.
बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये ओल्या मालाचे प्रमाण कमी झाले असून सुक्या मालाची आवक होत आहे. सुक्या मालालाच मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
किलोचे भाव : झेंडू : 30-70, गुलछडी : 300- 600, कापरी: 30-60, शेवंती : 40-80, ऑस्टर : 10-25, गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) : 20-50, गुलछडी काडी : 30-60, डच गुलाब (20 नग) : 60-150, लिलिबंडल (50 काडी) : 8-12, जर्बेरा : 30-60, कार्नेशियन : 80-120.