पुणे – टपाल खात्यातर्फे गुरुवारपासून (दि.9) ते शनिवारपर्यंत (दि.11) सलग तीन दिवस आधारकार्ड नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात आली. याला मिळालेला प्रतिसाद पाहता विभागातर्फे मोहिमेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
पुणे स्टेशनजवळील जनरल पोस्ट ऑफीस (जीपीओ), मार्केटयार्ड, येरवडा, हडपसर, पिंपरी कॉलनी, चिंचवड, औंध, खडकी, भोसरी, पी.सी.एन.टी.पोस्ट ऑफीस येथील टपाल कार्यालयांत या मोहिमेअंतर्गत विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती पोस्ट मास्तर जनरल मधुमिता दास यांनी दिली.