आता ‘शिंक’ सांगणार तुमच्या ‘आजाराचे कारण’

अमेरिकेतील संशोधकांनी तयार केले अनोखे ॲप

वाशिंग्टन : माणसाला येणारी शिंक आणि त्या शिंकेचा आवाज आता त्या माणसाला कोणता आजार झाला आहे हे सांगू शकणार आहे. याबाबतचे एक अनोखे ऍप अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केले आहे.  अमेरिकेतील हायपी लिंक नावाच्या कंपनीतील संशोधकांनी हे अनोखे ॲप विकसित केले आहे.

सर्वसाधारणपणे माणसाला जे आजार होतात त्या आजारांच्या कालावधीमध्ये माणसाच्या खोकल्याचा आणि शिंकेचा आवाज कशा प्रकारचा असतो ते सर्व आवाज या ॲपमध्ये नोंदवण्यात आले असून त्या आवाजाच्या आधारे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या त्या माणसाला कोणता आजार झाला आहे हे शोधता येणे शक्य झाले आहे.  अस्थमा निमोनिया आणि करोना यासारख्या आजारांची माहितीही या ॲपच्या माध्यमातून मिळू शकते.

ॲप विकसित करणाऱ्या कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पीटर स्मॉल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,  माणसाला सतावणाऱ्या विविध आजारांमध्ये त्याचे खोकल्याचे आणि शिंकेचे आवाजही वेगवेगळे असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून या आवाजांच्या वर्गीकरणाच्या आधारे त्या माणसाला कोणता आजार झाला आहे. हे या ॲपच्या मदतीने शोधणे शक्य होणार आहे. याबाबतचे अधिक सखोल संशोधन सध्या स्पेनमध्ये सुरू असून डॉक्टरांपेक्षा या ॲपच्या मदतीने आजाराचे निदान वेगाने होऊ शकेल असा दावा संशोधकांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.