दौंड(पुणे): दौंड शहरात आज दुपारी रोहित रवींद्र कांबळे या तरूणावर गोळीबार करण्यात झाला आहे. दौंड शहरात आज ( ता. २२) दुपारी चार वाजता दौंड- लिंगाळी रस्त्यावर दौंड न्यायालयापुढे वळणावर हा गोळीबार झाला. रोहित हा दुचाकीवर असताना अनोळखी हल्लॆखोराने रोहित याच्या मांडीवर व पाठीवर गोळ्या झाडल्या.
रोहित कांबळे याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. रोहित कांबळे हा रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा मुलगा आहे.
सदर गोळीबार हा पैशांच्या व्यवहारातून झाला आहे.