पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – महापालिका सांस्कृतिक कला मंच यांच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालन येथे महापालिका कर्मचार्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे कौतूक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, याचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विक्रम कुमार बोलत होते.
यावेळी महापालिकेच्या विधी विभागाच्या प्रमुख निशा चव्हाण, सुरेश परदेशी, संदीप खलाटे, अंकुश कानगुडे, राहुल वाघमारे, देवेंद्र भागवत, स्वाती सिद्धूल, ललित बोडे, अनिल चव्हाण, सुधाकर मेमाणे, प्रकाश उघडे, नरेंद्र दीक्षित, शितल वाघ, करुणा लघाडे यावेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनात फोटोग्राफी, पेंटिंग्स, हाताने तयार केलेल्या मूर्ती, काष्ठशिल्प, जुन्या नाण्यांचा संग्रह ठेवण्यात आले आत तर महापालिका कर्मचार्यांनी काढलेली चित्रेही ठेवण्यात आली आहेत. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १०:०० ते रात्री ०९:०० पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.