वडगाव मावळ – मावळ तालुका विधी सेवा समिती व वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. या लोकन्यायालयामध्ये सामंजस्याने फौजदारी, दिवाणी, तसेच दाखलपात्र असे 335 खटले निकाली निघाल्या. तसेच यामधून एकूण 2 कोटी 54 लाख 81 हजार 473 रुपयांचा महसूल जमा झाला.
एकमेकांमधील भांडणे मिटवण्यासाठी लोकन्यायायात सामंजस्याने वाद मिटवण्यसाठी लोकांनी पुढाकार घ्यावा. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पी. जी. देशमुख यांनी व्यक्त केले. लोकन्यायालये यशस्वी होणे ही काळाची गरज आहे, असे मत वडगाव मावळ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी. आर. उमरेडकर यांनी व्यक्त केले. नागरिकांचे वाद लोकन्यायालयात मिटावेत, यासाठी नेहमी प्रयत्न करू, असे मत सहन्यायाधीश बी. व्ही. बुरांडे यांनी व्यक्त केले.
लोकन्यायालयात पुणे येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. देशमुख, वडगाव मावळ येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी. आर. उमरेडकर, सहन्यायाधीश बी. व्ही. बुरांडे, एस. आर. बर्गे, एस. जे. कातकर, पी. एम. सूर्यवंशी, जी. एस. पाटील यांच्यासह ऍड. आकाश ढोरे, ऍड. काजल जाधव (गायकवाड), ऍड. पवन भंडारी, ऍड. प्रताप मेरुकर, ऍड. हर्षवर्धन काटकर, ऍड. निलेश हांडे, ऍड. अजय घोजगे, ऍड. प्रियांका दहिभाते, ऍड. राधा कलापुरे, ऍड. आरती भोईर, ऍड. रुबीया तांबोळी, ऍड. मनिषा रंगारी यांनी पॅनल जजेस म्हणून काम पाहिले.
लोकन्यायालयाच्या नियोजनामध्ये ऍड. राजेंद्र गाडे पाटील, ऍड. मच्छिंद्र घोजगे, ऍड. प्रताप शेलार, ऍड. अविनाश पवार, वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. तुकाराम काटे, सचिव ऍड. महेंद्र खांदवे, ऍड. जयश्री शितोळे, ऍड. अमोल दाभाडे, वडगाव न्यायालयात ऍड. रामदास नाणेकर, ऍड. शैलेश पडवळ, ऍड. अमोल दाभाडे, ऍड. पांडुरंग काळे, ऍड. गणेश शिराळकर, ऍड. राजेंद्र भंडारी, ऍड. शैलेश घारे, ऍड. हेमंत वाडेकर, ऍड. रुपाली भसे (सातकर), ऍड. समीर खांदवे यांनी सहभाग घेतला. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वडगाव मावळ बार असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.