देहूगाव -देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया प्रक्रियेतील उमेदवारी मागे घेण्याची मुदत सोमवारी (दि. 13) अंतिम दिवशी दुपारी तीन वाजेपर्यत होती. प्रभाग क्रमांक 13 मधून कॉंग्रेसच्या मावळ तालुका समन्वयक, देहू शहराध्यक्षा वनिता देशकर यांनी आणि इतर प्रभागातील नऊ अपक्षांनी उमेदवारी माघार घेतल्याने माघार उमेदवारांची संख्या 10 झाली आहे.
त्यामुळे निवडणूक रिंगणामध्ये 48 उमेदवार आहेत. कॉंग्रेसचे महिलेचा नामनिर्देशित अर्ज अवैध झाल्याने आणि कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षाने उमेदवारी मागे घेतल्याने कॉंग्रेसवर नामुष्की ओढवली.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 82 जणांचे नामनिर्देशनपत्र होते. छावणीमध्ये एका कॉंग्रेसच्या एका उमेदवारासह 20 जणांचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने निवडणूक रिंगणात 62 जण होते. यामध्ये चार जणांचे प्रत्येकी दोन अर्ज होते.
उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा देशकर यांचा प्रभाग क्रमांक 13 मधून आणि प्रभाग अनुक्रमे 3 मध्ये 3, 4 -1, 7 -1, 10-1, 16-1 तर 17-1 असे नऊ अपक्षांनी उमेदवारी माघार घेतल्याने तेरा प्रभागातून 48 उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये राष्ट्रवादी 13, भाजपा 13, शिवसेना 8, तर कॉंग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.
प्रभाग क्रमांक सहा, 13 मध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये लढत
देहू नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 13 प्रभागामधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, तर भाजपाचे 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर शिवसेनेचे 8 आणि कॉंग्रेसचे 5 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 6 आणि 13 मध्ये केवळ दोन उमेदवार आमने-सामने असून, भाजप आणि राष्ट्रवादी यामध्ये लढत होत असल्याने कोण विजय होणार तर कोणाचे उमेदवार अधिक विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.