पुणे – करोनाबाधितांची संख्या जास्त असलेली 59 ठिकाणे महापालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून सोमवारी जाहीर केली. यापूर्वी जाहीर 71 क्षेत्रांमधून 17 प्रतिबंधीत क्षेत्र वगळली असून 5 भागांचा नव्याने समावेश केला आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रांची यादी जाहीर केली.
यामध्ये त्यांनी जास्त रुग्ण असलेल्या 59 ठिकाणांची यादी जाहीर केली. मागीलवेळी 71 क्षेत्रांतून 17 क्षेत्रे वगळली होती. तर, यंदा पाच क्षेत्रांचा नव्याने समावेश केला आहे.
समावेश केलेल्या क्षेत्रांमध्ये वारजे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 1, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 3 आणि नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गन 1 परिसराचा समावेश आहे.
क्षेत्रांमध्ये बाहेरील व्यक्तींना अथवा तेथील व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असणार आहे, तसेच या भागात जाणारे-येणारे रस्ते पत्रे लावून बंद करण्यात येतील. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा घातल्या आहेत.
नवीन सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र
- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – कर्वेनगर, हिंगणे बुद्रुक, दुधाणे नगर, स.नं. 11 पै., 15 पै, साफल्य सोसायटी, सरगम सोसायटी, औदुंबर कॉलनी.
- नगररस्ता क्षेत्रीय कार्यालय – येरवडा टी.पी. स्किम, फा. प्लॉट, 61 पै. निलांजली सोसायटीचा काही भाग.
- शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय – शिवाजीनगर गावठाण, स.नं. 764 पै. स.नं. 765, भांबुर्डा, स.नं. 103 पै. बहिरटवाडी परिसर, गोखलेनगर, पोलीस लाईन बिल्डींग नं. 4 व 3.