वाघोली – रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडी व ग्रामपंचायत वाघोली तसेच वाघेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर शास्त्री यांच्या ऐतिहासिक समाधीचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला आहे.
वाघोली तालुका हवेली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात अनेक ऐतिहासिक तसेच संत महात्म्यांच्या समाधी असून याची देखभाल रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडी व देवस्थान ट्रस्ट वतीने करण्यात येत आहे. वर्षभर वारकरी संप्रदायाच्या पथे प्रमाणे विधिवत नित्य पूजा करण्यात येत आहे. वाघेश्वर मंदिर परिसरात असणाऱ्या रामेश्वर शास्त्री यांच्या समाधीचे दर्शन व पाहणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील,रामेश्वर प्रासादिक दिंडी सोहळ्याचे उपाध्यक्ष राजेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, गणेश सातव पाटील, नाना शिरसागर, यांनी केली.धनंजय महाराज प्रभुणे, व रवी काळे यांच्याकडून समाधीची नित्य पूजा करण्यात येत आहे. तसेच दत्तात्रय भाडळे यांच्याकडून वर्षभर हार फुलांची व्यवस्था करण्यात आली आहे.