मुंबई – अमेरिकन पॉप सिंगर रिहानाच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रिहाना बॉयफ्रेंड रॉकीच्या बेबी गर्लची आई बनली आहे. ही आनंदाची बातमी समजल्यानंतर चाहते, मित्र आणि जवळचे लोक खूप सोशल मीडीयावर आनंद व्यक्त करत आहेत. लोक एकापाठोपाठएक या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
जानेवारी महिन्यात माहिती समोर आली होती
जानेवारी महिन्यात रिहानाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आली होती. हार्लेमच्या रस्त्यावर फेरफटका मारत असताना पॉप गायक बेबी बंप दाखवत असल्याची छायाचित्रे उघड झाली. या जोडप्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. प्रेग्नेंसीदरम्यान रिहाना तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.
View this post on Instagram
दोघांच्या विभक्त झाल्याची चर्चाही रंगल्या
2022 मध्ये बॉयफ्रेंड रॉकीने रिहानाची फसवणूक केल्यावर त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवाही पसरल्या. मात्र, नंतर या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला. सध्या, रॅपर रॉकी आणि पॉप गायिका रिहाना बाळाचे पालक झाले आहेत आणि दोघेही त्यांच्या पहिल्या मुलाबद्दल खूप उत्सुक आहेत.
View this post on Instagram
रिहाना आणि रॉकी 2019 पासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या. पण 2021 मध्ये या जोडप्याने त्यांचे नाते अधिकृत केले. एका मुलाखतीदरम्यान रॉकीने रिहानाला ‘माझ्या आयुष्यातील प्रेम’ म्हटले होते.
View this post on Instagram
आता बाळाच्या आगमनानंतर रेहानाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यानंतर आता त्यांना लग्नही करावे, असे वाटते. अशा परिस्थितीत हॉलिवूड लाईफनुसार गायिका रिहानाने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.आता तिला रॉकीसोबतच्या नात्यात पुढचं पाऊल टाकायचं आहे. अशा स्थितीत ती आता एंगेजमेंट आणि नंतर लग्नाचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रिहाना 100% बॉयफ्रेंड राकीसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे.