जामखेड – मुंबईतील २६/११ हल्ल्यात शहीद जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिन स्मरणार्थ तरुणांमध्ये देशा, समाज व राष्ट्राप्रती प्रेमाची अन् त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलिस ठाण्यातर्फे सोमवारी (दि.४) रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असुन 111 जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रांताधिकारी सायली सोळंके , तहसीलदार योगेश चंद्र, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ जेष्ठ नेते प्रा मधुकर आबा राळेभात ,बिभीषण धनवटे, रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्करराव मोरे. सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे. रमेश आजबे, शमीर सय्यद , मयूर भोसले , हर्षल डोके सामाजिक कार्यकर्त्यां वैशाली शिंदे. मिरा तंटक सर्व पोलीस विभाग सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्तदानासारखे पवित्र कार्य कोणतेही नाही. कारण रक्तदानामुळे मृत्युच्या दारात असलेल्या व्यक्तीला जीवनदान देता येते.योग्य वेळेत योग्य व्यक्तीला योग्य ते रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. आणि हाच तुटवडा लक्षात घेऊन एखाद्या गोर गरीब व्यक्तीला जीवनदान देण्याचे कार्य रक्तदान शिबिरा सारख्या कार्यक्रमातून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून होत आहे. यावेळी संपूर्ण तालुक्यातून रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील. पोलीस बांधवासह ,111 नागरिकांनी रक्तदान केले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संगिता गिरी. पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती पोलीस नाईक अविनाश ढेरे पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश जाधव दिनेश गंगे. ज्ञानेश्वर कोतुळे. शिवाजी भोस. शिवाजी कदम. प्रकाश माडगे. जनकल्याण रक्तपेढीचे शरद बळे. शंकर खंडागळे. अनिता तरडे. सुलभा पवळ. गया चव्हाण. यांनी खास परीश्रम घेतला.