मोदींच्या राजीव गांधींवरील टीकेला पित्रोदांकडून उत्तर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांका गांधींचे वडिल दिवंगत राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की “स्वतःला मिस्टर क्‍लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले”. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून तीव्र टीका करण्यात आली होती.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी माध्यमांशी संवाद साधतांना भाजप तसेच मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “भाजप कारण नसताना राजीव गांधींचे नाव निवडणूक प्रचारात वापरत आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.