तेज बहादूर यादवांची उमेदवारी रद्द का झाली? कोर्टाने मागितले स्पष्टीकरण 

नवी दिल्ली – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द केल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. निवडणूक आयोगाला २४ तासात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना सपा-बसपा आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र, तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.