रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; व्याजदर जैसे थे!, सामान्यांना होणार ‘हा’ फायदा

मुंबई – रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.रिझर्व्ह बँकेनेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली असून या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणाविषयी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. दास यांनी सलग आठव्यांदा व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची माहिती दिली आहे.

रेपो दर 4 टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे सामान्यांच्या ईएमआय (EMI) मध्ये तुर्तास कोणताही बदल होणार नाही. याआधी ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये हे व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यावेळी माहिती देताना शक्तिकांत दास म्हणाले की, देशातील महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी, कोविड 19 चा अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत देशाचे पतधोरण सर्वसमावेशकच ठेवले जाईल.

भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. गेल्या पतधोरण आढावा बैठकीच्या तुलनेत अर्थव्यवस्था काहीशी सावरली आहे. विकासदराच्या बाबतीत देखील सकारात्मक चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा आहे, असे देखील शक्तीकांत दास म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.