सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील २४ संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील १३ जणांना फलटण तालुक्यातील क्वारंटाईन फॅसिलिटी केंद्रामध्ये व श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे अशा, विविध आजारांमुळे 11 जणांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
या सर्व 24 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
या सर्व २४ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.