रेपो दर ‘जैसे थे’च; रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

नवी दिल्ली – देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीपीडी वाढीचा दर १०.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली 

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर हे ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे कर्जदारांना ईएमआयमध्ये कोणताही दिलासा मिळालेला नसला, तरी झळही बसलेली नाही.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु, अर्थव्यवस्था सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. करोना प्रतिबंधक लसीसारख्या पावलांमुळे भारत हे आव्हान पेलण्यास सज्ज आहे. रिझर्व्ह बँकेने आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीपीडी वाढीचा दर १०.५ टक्के इतका अंदाज वर्तवला आहे. मागच्या पतधोरणातही रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढीचा हाच अंदाज वर्तवला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.