अन् त्या काँग्रेस नेत्यानं राज ठाकरेंना म्हटले,’…बहिरा’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.याच संबंधी आज राज ठाकरे यांनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी परप्रांतीयविरोधी सूर मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे.

यातच महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला असून ‘बहिरा नाचे आपन ताल!’ म्हणजे ‘बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते’ अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे.

दरम्यान, “परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.