नेवासा ( राजेंद्र वाघमारे ) : छोट्या – मोठ्या गरजू व्यावसायिकांना वेळेवर अर्थिक मदतीचा हात देवून बँकिंग क्षेञात एक आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या रेणुकामाता मल्टीस्टेट को – ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी नेवासा फाटा येथील शाखेचा दुसरा वर्धापनदिन रविवार (दि.४) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी खातेदार,ठेवीदार व व्यावसायिकांनी शाखेला वर्धापन दिनी भेट देत संस्थेवर सुभेच्छांचा वर्षाव केला.
रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांनी या संस्थेचे जाळे राज्यभर निर्माण करुन रोख-चोख आणि पारदर्शक कारभार संस्थेच्या माध्यमातून केला जात असल्यामुळे अल्पावधीतच खातेदार – ठेवीदारांच्या विश्वासास ही संस्था पाञ ठरलेली आहे. त्यामुळे नेवासा फाटा येथील रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी विविध क्षेञातील मान्यवरांच्या मांदियाळीत संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला
नेवासा फाटा येथील शाखाधिकारी अमोल म्हेत्रे, रोखपाल अनिल काळे,क्लर्क विकास जवरे,माधुरी राऊत यांनी यावेळी व्यावसायिक – ठेवीदार व विविध मान्यवरांच्या सुभेच्छाचा स्विकार केला. यावेळी संस्थेचे आर.सी विभाग प्रमुख दिनेश टकले, विभागप्रमुख भरत लहाने,गंगापूर शाखाधिकारी शुभम गवांदे,विजय चव्हाण आदी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.वर्धापनदिनी या संस्थेला भाजपाचे जेष्ठनेते दिनकरराव ताके – पाटील,बाळासाहेब भणगे,जेष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे,अशोकराव पेहरकर,सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाणी यांच्यासह सामाजिक – धार्मिक – अर्थिक व राजकिय क्षेञातील विविध मान्यवरांनी संस्थेला भेट देत सुभेच्छांचा वर्षाव केला.