नाम याद रखना..व्ही.सी.सज्जनार…..

हैद्राबाद पोलिस एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव

नवी दिल्ली : हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटर करत ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी घटना स्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे.

सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्यातही या एन्काउंटरवरमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार हे सर्वांच्या चर्चेचे केंद्र स्थान आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी सज्जनार यांचे अभिनंदन केले आहे.

व्ही. सी. सज्जनार यांनी रात्री तीन ते पहाटे सहाच्या दरम्यान हा एन्काउंटर केल्याची माहिती दिली आहे. सज्जनार यांनी याआधी वारंगल ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपींचाही एन्काउंटरमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. 2008 साली वारंगल येथे दोन मुलींवर ऍसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही पोलिस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. तेव्हा या तिघांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रतिउत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे तिघेही आरोपी ठार झाले होते. या प्रकरणामध्ये एस. श्रीनिवास राव या मुख्य आरोपीबरोबरच पी. हरी कृष्णन, संजय अशा एकूण तीन जणांना पोलिसांनी ठार केले होते. या तिघांनी मामोनूर येथे स्वप्नीका आणि प्रणीता या मुलींवर ऍसिड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये श्रीनिवासची प्रेयसी स्वप्नीका गंभीर जखमी झाली होती.

अनेकांनी सज्जनार यांचे ट्विटवरुन अभिनंदन केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)