तेलंगाना चकमक: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठविली नोटीस

नवी दिल्ली: हैदराबादमध्ये बलात्काराचा आरोप असलेल्या ४ जणांच्या शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) दखल घेतली आहे. वृत्तसंस्था एएनआय च्यानुसार एनएचआरसीने आपल्या महासंचालकांना या घटनेची सत्यता शोधण्यासाठी एसएसपीच्या अध्यक्षतेखाली एक पथक तातडीने पाठवण्याचे व त्याबाबतचे प्रकरण लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एनएचआरसीच्या नोटिशीवर सायबरबादचे पोलिस आयुक्त बी.सी. सज्जनर म्हणाले आहेत की आम्ही एनएचआरसीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. विशेष म्हणजे या घटनेपासून बरेच लोक या प्रकरणावर प्रश्न विचारत आहेत. शुक्रवारी पहाटे तीन वाजता चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले. या चार आरोपींवर महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्काराचा आरोप होता.

पोलिसांचा दावा आहे की हे सर्व आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि पोलिसांच्या गोळीबारात सर्व आरोपी ठार झाले. याप्रकरणी प्रशासन आणि सरकारवर आनंद व्यक्त करताना पीडितेच्या वडिलांनी सांगितले की आता आपल्या मुलीला शांती मिळाली असेल. त्याचबरोबर ‘निर्भया’च्या आईनेही कौतुक केले आहे आणि आपल्या मुलीच्या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.