नवी दिल्ली – हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या घटनेवर भाजप नेते नितेश राणे यांनी पोलिस सुरक्षित.. तर आपण सुरक्षित, असे ट्विट केले आहे.
नितेश राणे म्हणाले कि, म्हणून बोलतो… पोलिसांवरचे हल्ले 100 टक्के थांबले पाहिजेत!!! आज आपल्याच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या समाजाची लाज राखली आणि आपली कॉलर टाईट केली! पोलिस सुरक्षित.. तर आपण सुरक्षित!!
म्हणून बोलतो..
पोलिसांवरचे हल्ले 100 टक्के थांबले पाहिजेत!!!
आज आपल्याच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या समाजाची लाज राखली आणि आपली कॉलर टाईट केली!
पोलिस सुरक्षित.. तर आपण सुरक्षित!!— nitesh rane (@NiteshNRane) December 6, 2019
दरम्यान, बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. चारही आरोपींना त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.