महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप
(सुनील राऊत) पुणे : सहकार नगर मधील पूरग्रस्त भागातील नागरिकांना महापालिकेकडून वाटण्यात येणाऱ्या जीवनावश्यक मदतीच्या किट वर पालिकेच्या मदत वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूरग्रस्त भागात सोमवारी मदत वाटप करण्यासाठी उद्यान विभागाचे पथक गेले होते.
या पथकाकडे तेल, चटई, पाण्याचे जग तसेच साखर, शेंगदाणे तसेच इतर भुसार मालाचे किट होते. या पथकाने पर्वती दर्शन परिसतरील काही नागरिकांना मदत वाटप केली.
त्यानंतर शिल्लक माल परत घेऊन हे पथक पेशवे उद्यानाच्या कार्यालयात आले. या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी शिल्लक राहिलेली किट वाटून घेतली. त्यावेळी या साहित्यावरून काही कर्मचाऱ्याचा वादही झाला. त्यातुन हा तक्रार समोर आला आहे.
तर एक कर्मचारी आपल्या खासगी गाडीतून पाण्याचे 20 ते 25 भांडी तेवढ्याच चटया घरी घेऊन गेल्याचे काही कर्मचाऱ्यांनी दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीला कळविले.