रिझर्व बँकेच्या निर्बंधाखाली चालू असलेल्या बँका

पीएमसी आणि लक्ष्मीविलास बँकेबरोबरच देशाच्या विविध भागातील नऊ बँका सध्या रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार काम करत आहेत. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले असल्याने या बँकांमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकून पडले आहेत.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) 24 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले. त्यामुळे ग्राहकांना बँकेतील खात्यातून फक्त 1,000 रुपये काढता येऊ लागले. नंतर ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांखाली काम करणाऱ्या आणखी बँका…

1)  कपोल सहकारी बँक – मुंबईतील या बँकेवर 31 मार्च 2017 पासून निर्बंध घालण्यात आले आहेत. चालू वर्षाच्या सुरवातीला बँकेच्या अडीच लाख ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींचे रुपांतर बँकेच्या भागभांडवलात करण्याचा प्रस्ताव दिला होता. जेणेकरून बँकेचे पुनरुज्जीवन व्हावे. मात्र अद्यापही बँकेवरील निर्बंध मागे घेण्यात आलेले नाहीत.

2) रुपी सहकारी बँक – 22 फेब्रुवारी 2013 पासून रिझर्व्ह बँकने या बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. या बँकेचे विलीनीकरण एखाद्या सशक्त बँकेत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अद्याप या प्रयत्नांना यश आलेले नाही. बँकिंग परवान्याला वेळोवेळी मिळत असलेल्या मुदतवाढीवर बँक चालू आहे. आता बँकेच्या परवान्याची मुदत 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे.

3) सीकेपी सहकारी बँक – 103 वर्षांचा इतिहास असलेली ही बँक 2 मे 2012 पासून रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाखाली काम करत आहे. 2015 मध्ये बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींचे भागभांडवलात रुपांतर केले. तरीही निर्बंध कायम आहेत.

4) द नीडस् ऑफ लाईफ को-ऑपरेटिव्ह बँक – मुंबईतील या बँकेवर 29 ऑक्टोबर 2018 पासून निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक गैरव्यवहार आणि अनियमिततेबद्दल बँक चर्चेत आहे. बँकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्याला संचालक म्हणून नेमण्याची कामगिरी बँकेने केली आहे.

5) युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक – कोल्हापुरातील ही बँक 5 जानेवारी 2019 पासून निर्बंधानुसार काम करत आहे. बँकेच्या कोल्हापुरात 14 शाखा आहेत.

6) शिवम सहकारी बँक – इचलकरंजीतील या बँकेवर 19 मे 2018 पासून निर्बंध आहेत.

7) द सिटी को-ऑपरेटिव्ह बँक – मुंबईतील या बँकेवर 17 एप्रिल 2018 पासून निर्बंध आहेत. मार्च 2019 अखेर या बँकेत 440 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

8) मराठा सहकारी बँक – मुंबईतील ही बँक 31 ऑगस्ट 2016 पासून निर्बंधांखाली आहे.

9) कराड जनता सहकारी बँक – या बँकेवर 7  नोव्हेंबर 2017 पासून निर्बंध आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)