आलिया भटची मोस्ट अवेटेड फिल्म “गंगुबाई काठियावाडी’ची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा आता 18 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. करोनाच्या साथीदरम्यान “गंगुबाई…’ला वारंवार पुढे ढकलले गेले होते. यापूर्वी रिलीज डेट 11 सप्टेंबर 2020 रोजी होती. मात्र, काही कारणाने ही तारीख पुढे ढकलली गेली.
त्यानंतर 6 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही तारीख नंतर बदलण्यात आली आणि आता 18 फेब्रुवारीला “गंगुबाई…’मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसने ट्विटरवर एक पोस्ट करून या नवीन रिलीज डेटची घोषणा केली आहे. गंगुबाईच्या जीवनावरील हा सिनेमा प्रसिद्ध लेखक हुसैन जैदीचे पुस्तक “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’मधील एका प्रकरणातून आकाराला आले आहे.
1960 च्या दशकात मुंबईतील कामाठीपुरा भागातील भागात गंगुबाईचा मोठा दबदबा होता. भन्साळींच्या प्रॉडक्शन हाउसने केलेल्या ट्विटला एक समर्पक कॅप्शनही देण्यात आली आहे. “शक्ती, साहस आणि निडरतेसह यांचा उदय बघा’ असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.