भोर – कोंढरी गावात भूस्खलन झाल्याने गावचे शंभर टक्के पुनर्वसन तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन पुनर्वसन राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी दिले.
कोंढरी गावाची पाहणी मंत्री भेगडे यांनी केली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, प्रभारी तहसीलदार मृणाली मोरे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता रहाणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब गरुड, तालुकाध्यक्ष गणेश निगडे, अमर बुदगुडे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कोंढाळकर, विजय शिरवले, सरपाले, सरपंच कोंढाळर, माजी सरपंच भिवा पारठे, बबन मालुसरे, अरुण मालुसरे उपस्थित होते. मंत्री भेगडे म्हणाले कोंढरीतील जमिनीचा जिओलॉजिकल तर्फे सर्व्हे करण्यात आला असून भूवैज्ञानिक रेडी यांनी तुर्तास येथे राहणे धोक्याचे असल्याचे सूचित केले आहे. हिर्डोशी खोऱ्यात शासनातर्फे मदत केली जाईल. आमदार थोपटे म्हणाले, रस्त्याच्या कामासाठी वाढीव निधी मिळावा. शासनाने 5 एकर जागा रस्त्याच्या जवळपास उपलब्ध करुन देवून तेथे त्यांचे पुनर्वसन, नागरी सुविधा द्याव्यात. या मागणीला भेगडे यांनी हिरवा कंदिल दिल्याने ग्रामस्थांनी भेगडे, थोपटेंना धन्यवाद दिले.