पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉक डाऊननंतर काही ठिकाणी जुगार अड्डे, सोरट, सट्टे असे बेकायदा धंदे सुरु करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र पोलिसांनी वेळीच हे धंदे कारवाई करत बंद केले.
सध्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे कोणतेही धंदे सुरु नाहीत. पोलीस नियमीत गस्त घालत अवैध्य धंद्यांना आळा घालत आहेत. दरम्यान पोलीस एका जुगार अड्डयाशेजारी उभे असल्याचे एक छायाचित्र प्रसिध्द झाले होते, ते कारवाई करतानाचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भारती विद्यापीठ परिसरात कात्रज, जांभुळवाडी, दत्तनगर, आंबेगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग रहातो. यामुळे त्यांचा ओढा असा प्रकारांकडे असतो. मात्र भारती विद्यापीठ पोलीस नियमीत गस्त व सातत्यपुर्ण कारवाया करत असल्याने अवैध्य धंद्यांचे समुळ उच्चटन झाले आहे. स्थानिक नागरिक असे काही आढळल्यास पोलिसांना खबर देत असतात. यामुळे पोलिसही सजग राहून कारवाई करत असताता.
“अवैध्य धंद्यावर पोलिसांची नियमीत कारवाई सुरु असते. यामुळे परिसरातील अवैध्य धंद्यांना चाप बसला आहे.”
– जगन्नाथ कळसकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)