मुंबई – अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या जोडीचा अबहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. मात्र, भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे 40 टक्के शूटिंग अजून बाकी आहे. परिणामी धर्मा प्रॉडक्शनने आलिया-रणबीरचे मानधन कमी करण्याचा सुद्धा निर्णय घेतला.
दरम्यान, निर्माता करण जोहरने या सगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत. करण जोहरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. करण म्हणाला कि, “मी प्रसार माध्यमांमधील माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की आमच्या चित्रपटाविषयी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. व्यवसायासाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे आणि खोटी बातमी केवळ परिस्थिती अधिक खराब करते. कोणत्याही विषयाची अधिकृत घोषणा होईपर्यंत थांबा !! ही नम्र विनंती आहे”.
My hugest request to my media friends not to reach any assumptions on our fraternity films…these are challenging times for the business and false news only makes the situation worse! Please wait for official news on any account!! This is a humble request….
— Karan Johar (@karanjohar) May 4, 2020
दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट उन्हाळ्यात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते. पण चित्रपटात टाकण्यात येणाऱ्या व्हीएफएक्सचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सतत बदलत आहे.