Swanandi Tikekar : अभिनेत्री स्वानंदी टिकेवर (Swanandi Tikekar) व गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांचे नुकतेच मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील दोघांचाही लुक अनेकांच्या पसंतीस पडला. यातच आता त्यांच्या रिसेप्शनचे फोटो समोर आले असून त्यांच्या लुकची चांगलीच चर्चा होत आहे.
रिसेप्शनसाठी स्वानंदीने रिसेप्शनला लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती. तर गळ्यात हिरव्या रंगाचे भरजरी दागिने घातले होते. तर आशीषने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्यावर त्याचं रंगाची शाल घेतली होती. रिसेप्शनचा हा शाही लूकचा फोटो स्वानंदीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअऱ केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “मला तुझ्यात माझी प्रेमकथा सापडली आहे. मी तुझ्यावर सदैव प्रेम करत राहीन” स्वानंदी व आशीषचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
स्वानंदी व आशीषच्या मेहंदी, हळदी, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नात स्वानंदी व आशिषने पारंपारिक लूक परिधान केला होता. स्वानंदीने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती व आशीषने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दरम्यान, अभिनेत्री स्वानंदी टिकेवर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहचली. यात अतुट मैत्रीचे नाते सुंदररित्या दाखवण्यात आले होते. या मालिकेची टीमने देखील स्वानंदी व आशिषच्या हजेरी लावली होती.