राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.31 टक्क्यांवर

मुंबई : राज्यात आज 10,225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 15,24,304 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.31 % एवढे झाले आहे.

आज राज्यात 4,009 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 16,87,784 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 104 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 % एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 90,65,168 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  16,87,784 (18.62 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25,33,782 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 12,195 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,18,777 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.