पुणे : येरवडा पोलीस ठाण्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या वसुली मामाच्या कारनाम्याची दोन भागात वृत्त मालिका दै. प्रभातने लावली होती. या वृत्तानंतर पोलीस दलात खळबळ माजली होती. याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली होती.
वसुली मामाच्या कारनाम्यांची कुंडली काढल्यावर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. यामुळे वरिष्ठ पातळीवर निर्णय घेत, त्याची उचल बांगडी करण्यात आली आहे. त्यांची बदली झाल्याने व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास टाकत प्रभातचे आभार मानले आहेत इतकेच नव्हे तर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आता वसुली मामाला पाठिशी घालणाऱ्या वरिष्ठांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसुली पंटर्सचे थेट “कनेक्शन’; महिना 70 लाख “कलेक्शन’!