माद्रीद – अव्वल स्ट्रायकर करीम बेंझेमा याने सामना संपण्यापूर्वी काही क्षण आधी केलेल्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रीदने स्पॅनिश करंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात ऍथलेटिक बिलबाओ संघाचा 3-1 असा पराभव केला.
या सामन्यात टोनी क्रुझने 46 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर सामन्याच्या 52 व्या मिनिटालाच ऍथलेटिक बिलबाओ संघाच्या एंडर केपा याने गोल करत बरोबरी मिळवून दिली. हा सामना बरोबरीत सुटणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, त्यानंतर बेन्झेमाने 74 व 92 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी भक्कम केली व संघाचा विजय साकार केला. या विजयामुळे रेयाल माद्रिदने स्पर्धेच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.