पुणे – जळगावमधील एका शैक्षणिक संस्थाचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे संस्थाचालकास चाकुचा धाक दाखविल्याप्रकरणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीष महाजन यांच्याविरुद्ध जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची शक्यता आहे, मात्र अद्याप गुन्हा वर्ग झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.