वाराणसी – ओएलएक्स या वस्तू विक्रीच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील कार्यालयाचे फोटो टाकून ते विक्रीला काढल्याची जाहिरात दिली.
त्यासाठी साडेसात कोटी रुपयांची बोली लावली. पोलिसांनी आता ती ऍड काढून टाकली. एफआयआर नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीतील संसदीय कार्यालय व्हिला हाऊस म्हणून विक्रीला काढले. चार रुम आणि चार बाथरूम असणाऱ्या या वास्तूची कारपेट एरीया सहा हजार 500 फूट आहे, अशी माहिती फोटोसह देण्यात आली.
पोलिसांनी आता ही जाहिरात काढून टाकली असून या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. ही विक्री करणाऱ्याचे नाव लक्ष्मिकांत ओझा आहे. त्याने या वास्तूचे आतील फोटोही टाकले आहेत.