#corona: एकदा वाचा…परिस्थिती कळेल…पोलंड वरून वैभव शिंदे

एकदा वाचून आपण सर्वांनी आवश्यक काळजी घायला हवी.

पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाची आहे. एकदा वाचून आपण सर्वांनी आवश्यक काळजी घायला हवी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायला हवे.


मी युरोपची परिस्थिती खुप जवळुन बघतोय… जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, स्विझर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांच्या न्यूज वर माझे बारीक लक्ष आहे. वेगवेगळ्या देशांमधील मित्रांशी संपर्क साधतोय… माझ्या कंपनी काम संदर्भातल्या डायरीवर मी काही गोष्टी लिहून ठेवतोय… त्यांचं काय चुकलं, त्यानंतर त्यांनी काय केलं हे सर्व मी बघतोय… बर्लिन तसं माझं आवडत शहर, पण आज ते पुर्ण स्तब्ध झालाय… आज ते काय परिस्थितीतुन जात आहेत हे सर्व मी बघतोय… जे कोणी बाहेर फिरतांना दिसतील त्यांना 300-500 युरो म्हणजे 24000-40000 पर्यंत दंड आकारला जातोय… घरातुन कोणी बाहेर पडायला तयार नाहीये… जर्मनीला काल 4600 पेशंट पॉझिटिव्ह सापडले… टोटल आता 20000 झाले… हात लावेल त्या जागेवर विषाणु बसले आहेत असचं समजा… घराघरात कोरोनाचे पेशंट तयार झाले आहेत… आई, बाप, भाऊ, बहीण, बायको, मुलगा, मुलगी, प्रेयसी कोण कुठे अ‍ॅडमिट आहेत… जिवंत आहे कि मेले हे सुद्धा कळायला त्यांना मार्ग राहिला नाहीये… जे मेले त्यांच्या घरच्यांनाही माहित नाही कि आपला बाप-आई, मुलगा-मुलगी, बायको मेले कोरोनात… ही परिस्थिती आपल्याकडे येऊ नये त्यामुळे मी महाराष्ट्रातील माझ्या मित्र परिवाराला वारंवार काळजी घेण्याची विनंती करतोय…

युरोपची परिस्थिती सांगतोय… महाराष्ट्रापेक्षाही छोटे देश आहे आणि 3-4 कोटी लोकसंख्या आहे तरीही आज अशी भयानक परिस्थिती त्यांच्यावर आहे… आपल्या महाराष्ट्रात 13-15 कोटी लोकसंख्या आहे, विचार करा आपली काय अवस्था होईल… असं बोलायला नाही पाहिजे, पण विचार करा, म्हणुन सांगतो, जर लोकांनी बंद पाळला नाही तर आपली अवस्था यांच्यापेक्षाही बिकट होईल, दुदैर्वाने कोरोनात कोणी मृत्युमुखी पडलंच तर घरातल्या लोकांना त्याचे तोंडही बघता येणार नाही… अंत्यसंस्कारही करता येणार नाहीत मित्रांनो… आपल्याकडील लोकांना अजून परिस्थितीच गांभीर्य नाहीये… म्हणुन सांगतो घरी शांत बसा… पाया पडून हात जोडून विनंती करतो… मी कोरोनाला खुप सिरीयसली घेतोय, कारण मी सगळं लाईव्ह बघतोय कसे हे कोरोनाच्या विळख्यात सापडत गेले… युरोपियन लोकांचं काय चुकलं हे सांगायचं झालं तर अतिशहाणपणा आणि मुजोरपणा नडला… प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली होती, जनतेला सतर्क केलं होतं, हॉस्पिटल सज्ज केले होते… पण जेव्हा प्रशासन सांगत होतं कि घराबाहेर पडू नका तेव्हा यांनी ऐकलं नाही… ते लोक पब, क्लब, थिएटर, बीचवर जाऊन बसले… हे लोक स्वभावाने चांगले आहे… पण यांच्यावर कोणी जबरदस्ती केलेली यांना आवडत नाही… हे यांच्या मनाप्रमाणे ऐकणारे लोक… बापाचं ऐकत नाहीत, तेव्हा प्रशासन लांबच… त्याचेच परिणाम आज हे भोगत आहेत…

सांगायला माझ्याकडे खूप डेटा आहे… सर्व नोट करतोय… बघतोय अनुभवतोय… पण याच अनुभवाचा फायदा माझ्या महाराष्ट्राला व्हावा म्हणुन मी तुमच्यापुढे हे सर्व मांडतोय… कधी कधी वाटत लाईव्ह येऊन सगळी परिस्थिती सांगावी… पण काही कारणास्तव मी तसे करू शकत नाही… मी हे सगळं सांगतोय, याच कारण एवढंच कि या देशांची एक चूक झाली आणि ती पुढे कशी घातक झाली हे मी अनुभवतोय आणि ती परिस्थिती महाराष्ट्रावर येऊ नये म्हणुन मी सगळं सांगतोय… जीव तोडुन… ऐका माझं… तुमच्या आई, वडील, बायको, मुलांसाठी तरी ऐका… शिवरायांनी आणि अनेक मावळ्यांनी रक्त सांडुन उभा केलेला आपला महाराष्ट्र आपल्याला जगवायचा आहे मित्रांनो… सगळ्या एअरलाईन्स एअरपोर्ट बंद झाले आहे, तिकीट बुकिंग होत नाहीये… मला भारतात काही दिवस येताही येणार नाही, पुढे काय होईल हे सर्व मला दिसतंय तरीही माझं मन खंबीर आहे अजुन, कारण लढण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंपासून घेतली आहे… रायगडाची माती कपाळाला लागली आहे… मी इथली परिस्थिती का जीव तोडुन तुम्हाला सांगतोय हे लक्षात घ्या… आणि सतर्क वागा… एक बरं वाटलं, अनेकांचे मेसेज येत आहेत, कि तुझ्या पोस्टमुळे आम्हाला कोरोनाचं गांभीर्य कळलं, कळतंय… घरी बसा… बंद पाळा… आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन प्रशासनाला मदत करा…

या जागतिक युद्धात माझ्या महाराष्ट्राला जिंकावण्यासाठी, टिकवण्यासाठी माझं गवताच्या काडी इतकं जरी योगदान राहील तर जन्माला येऊन आयुष्य सार्थकी लागल्याचं समाधान असेल…

– वैभव शिंदे

3 Comments
 1. किशोरी भोर says

  खूप सत्य परिस्थिती मांडली वैभव आम्ही हे सर्व पाळ तोय.. परंतु खरचं तू म्हणतोस तसं काही लोक अजूनही मनावर घेत नाहीत व आपण सांगितल तर ऐकत नाहीत .शासन आपल्या जीवाची एवढी काळजी करत य मग आपण आपल्या स्वतः ची व कुटुंबाची काळजी का करू नये एवढं ज्याला समजेल तोच महाराष्ट्र वाचवेल.तरीही खूप महत्वपूर्ण भूमिका तू बजावलीय खूप खूप आभार.

 2. Seema Pawar says

  Thanks vaibhav tu dilelya mahiti mule Corona kiti bhayanak aahe aani aami ttyasathi ky kalji ghetli pahije.
  Tysm ??

 3. B. K. Panchal says

  याच्या आधी कधीच अशी वेळ आली नव्हती म्हणुन कदाचित लोकांना त्याची जाणीव नाही, पण हळूहळू सर्वांना लक्ष्यात येत आहे की आपण जर काळजी घेतली नाही तर हे आपल्यावरच संकट वाढणार आहे म्हणुन आता सर्व जण काळजी घेत आहेत आणि प्रशासनाला साथ देत आहेत. धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि तिथल्या परिस्थिती चा आढावा दिल्याबद्दल. धन्यवाद!!!

Leave A Reply

Your email address will not be published.