अथेन्स : ग्रीसमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान कायरियाकोस मित्सोताकिस यांच्या न्यू डेमोक्रसी पार्टीला मोठा विजय मिळाला असला, तरी संसदेमध्ये निर्विवाद बहुमतासाठी नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे.
काल निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर न्यू डेमोक्रसी पार्टीला एकट्याच्या बळावर सरकार स्थापन करता येऊ शकणार नाही, असे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील मांडला गेला होता. मात्र प्रमुख विरोधी पक्षाने चर्चेचे निमंत्रण नाकारले. तसेच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणूनही सरकार स्थापन करण्यास नकार दिला.
म्हणून नव्याने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 25 जून रोजी देशात पुन्हा निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. तेंव्हा देशाच्या निवडणूक यंत्रणेमध्ये बदल झालेला असेल. निवडणुकीत मोठा विजय मिळवणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची तरतूद या सुधारित कायद्यामध्ये असेल.