आबूधाबी – कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर देवदत्त पडिक्कल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राॅयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान राॅयल्सवर 8 गडी राखून शानदार विजय मिळविला आहे. विजयासाठीचे 155 धावांचे आव्हान बेंगळुरूने 19.1 षटकांत 2 गड्याच्या मोबदल्यात 158 धावा करत सहज पूर्ण केलं. बेंगळुरूकडून 24 धावा देत सर्वाधिक 3 गडी घेणारा युजवेंद्र चहल सामन्याचा मानकरी ठरला.
Be right back. We’re looking for new adjectives. #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #Dream11IPL #RCBvRR pic.twitter.com/c4I02zTi3w
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 3, 2020
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून विराट कोहलीने 53 चेंडूत (7 चौकार व 2 षटकार) सर्वाधिक नाबाद 72 धावांची खेळी करताना संघास विजय मिळवून दिला. याशिवाय सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने 45 चेंडूत ( 6 चौकार व 1 षटकार) 63 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिले. अॅरोन फिंचने 8(7) तर एबी डी विलियर्सने नाबाद 12(10) केल्या. राजस्थान राॅयल्सकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चर (4 षटकांत 18 धावा ) आणि श्रेयस गोपाल (4 षटकात 27 धावा) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Not gonna lie, we saw this coming. 🤷🏻♂️ #PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #Dream11IPL #RCBvRR pic.twitter.com/7inWMBUASE
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 3, 2020
तत्पूर्वी, राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या होत्या. यामध्ये महिपाल लोमरोर याने 39 चेंडूत (1 चौकार व 3 षटकार) सर्वाधिक 47 धावा केल्या. तर जोस बटलरने 22(12), राॅबिन उथप्पा 17(22), रियान पराग 16(18) आणि राहुल तेवतियाने नाबाद 24(12) आणि जोफ्रा आर्चरने नाबाद 16(10) धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथ 5(5) आणि संजू सॅमसन 4(3) स्वस्तात बाद झाले.
A fighting finish by that man, Tewatia again! 💪
We believe in our bowlers. Come on!!! 💥#RCBvRR | #HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/69UI6nOzeF
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 3, 2020
बेंगळूरकडून गोलंदाजीत युजवेंद्र चहलने 4 षटकांत 24 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. इसरू उदाना याने 4 षटकांत 41 धावा देत 2 तर नवदीप सैनीने 4 षटकांत 37 धावा देत 1 गडी बाद केला.