मुंबई – आयपीएल (IPL 2022) च्या 39 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) आमने-सामने असणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने राजस्थान रॉयल्सविरुद्ध टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#RCB have won the toss and they will bowl first against #RR.
Live – https://t.co/LIICyVUet1 #RCBvRR #TATAIPL pic.twitter.com/2Hbl4BX2dp
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2022
टाॅसच्या दरम्यान कर्णधार डु प्लेसिसने सांगितले की, विराट कोहली सलामीला येईल. अनुज रावतला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. त्याचवेळी रजत पाटीदारला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संघात दोन बदल केले आहेत. करुण नायरच्या जागी डॅरिल मिशेल आणि ओबेद मॅकॉयच्या जागी कुलदीप सेनला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (C/W), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरिल मिशेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रनंदेश कृष्णा, युझवेंद्र चहल