यस बँकेबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – व्यवहारातील अनियमिततांमुळे अडचणीत सापडलेल्या यस बँकेला अडचणीतून तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पावलं उचलली आहेत. आरबीआयतर्फे आज, रिझर्व्ह बँकेचे माजी उप-गव्हर्नर आर गांधी व एस पी जैन मॅनेजमेंट व रिसर्च इंस्टीट्युटमधील प्राध्यापक अनंत नारायण गोपालकृष्णन यांची यस बँकेच्या अतिरिक्त संचालकपदावर निवड करण्यात आली आहे.

गांधी व गोपालकृष्णन हे येत्या २ वर्षांसाठी यस बँकेच्या अतिरिक्त संचालक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तत्पूर्वी, अडचणीत सापडलेल्या यस बँकेला वाचवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने गंतवणूक केली असून आरबीआय देखील बँक वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

रिझर्व्ह बॅंकेचेही “वर्क फ्रॉम होम’

Leave A Reply

Your email address will not be published.